
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह आढळला. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं सिने जगतातून आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे. ते गेले ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
