राज्यपालांच्या सहीनंतर खातेवाटप जाहीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील वादामुळे खातेवाटप लांबणीवर पडत असल्याचं बोललं जातं होतं. अखेर आज खातेवाटपाला मुहूर्त मिळाला. खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे गेली आणि त्यावर त्यांची सही झाली. त्यानंतर खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यास शिंदे गटाचा विरोध असल्याचं बोललं जात होतं. ज्या कारणासाठी शिवसेना शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला, तेच खातं अजित पवार यांना मिळालं. यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दोन दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेटले. या भेटीनंतर अजित पवार अर्थ खातं मिळवण्यात यशस्वी ठरले. इतकंच काय तर शिंदे गटाकडचं कृषी खातंही राष्ट्रवादीने घेतलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडचं कृषी खातं धनंजय मुंडे यांना देण्यात आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानंतर त्यांना परिवहन खाते मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

अजित पवार – अर्थ

दिलीप वळसे पाटील – सहकार

हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

छगन भुजबळ – अन्न व नागरी

आदिती तटकरे – महिला व बालविकास

🤙 8080365706