
श्रीहरिकोटा : ‘चांद्रयान-3’ मिशन ‘चंद्र मिशन’ हे 2019 च्या ‘चांद्रयान-2’ चे फॉलो-अप मिशन इस्रोकडून आखण्यात आले आहे. अवकाश शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे.

आजचे मिशन यशस्वी झाले तर भारत अमेरिका, चीन आणि माजी सोव्हिएत युनियनसारख्या देशांच्या क्लबमध्ये सामील होणारा चौथा देश ठरणार आहे.
दुपारी 2.35 वाजता LVM3M4-चांद्रयान-3 मिशनच्या प्रक्षेपणासाठी काउन्टडाऊन सुरू झाले आहे. चांद्रयान-3′ कार्यक्रमांतर्गत, इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट-लँडिंग’ आणि चंद्राच्या भूभागावर रोव्हर रोटेशनचे प्रात्यक्षिक करून भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी दाखविणार आहे. LVM3M4 रॉकेट इस्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-3’ ला चंद्रावर घेऊन जाणार आहे. अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे
