
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 3.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पेटाळा मैदान, कोल्हापूरकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता शिवसेना पक्षाचा मेळावा (स्थळ : पेटाळा मैदान, कोल्हापूर), सायंकाळी 6 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
