
मुंबई: सध्या दिल्ली येथे मंत्री मंडळ विस्ताराबाबत मोठ्या प्रमाणात बैठक्या पार पडत असून महाराष्ट्र राज्यातील काही खासदारांना मंत्री पदे मिळण्याची दाट शक्यता असल्याची महत्वाची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे नाव आघाडीवर असून केंद्रात सहकार विभागात मंत्री पद देण्याबाबत त्यांच्या नावाचा विचार वरिष्ठ करत असल्याची माहिती आहे. महाडिक व त्यांच्या कुटुंबीयांचा कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील जनसंपर्क तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील आमदार ,खासदार यांचा राज्यसभा निवडणुकीमुळे आलेला परिचय अश्या जमेच्या बाजू आहेत.
महत्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांची विशेष मर्जी महाडिक यांच्यावर असल्यामुळे त्यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. धनंजय महाडिक यांची ससंदरत्न अशी देखील ओळख दिल्ली दरबारी आहे. यातच काही दिवसांपूर्वी महाडिक यांनी आपल्या कुटुंबासमवेत पंतप्रधान नरेंद मोदी यांची भेट घेतली होती.
