
कोल्हापूर : कसबा बावडा येथील नेहा गगन पाटील – कोंडेकर यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पीएसआयपदी निवड झाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी नेहा पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

नेहा यांनी विवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत यशाचे शिखर गाठले. नेहा यांचे प्राथमिक शिक्षण बावड्यातील छत्रपती राजाराम हायस्कूल येथून झाले. यानंतर विवेकानंद कॉलेज येथून त्यांनी बीसीएसची पदवी घेतली. मुलीने खाकीवर्दीतील अधिकारी बनावे असे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीसाठी नेहा यांनी नरके फाउंडेशनमध्ये प्रवेश घेतला. त्यांचा विवाह गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गगन पाटील यांच्याशी झाला.लग्नानंतर घरीच राहून नेहा यांनी अभ्यास केला. त्यांना अरुण पाटील, दीपक अतिग्रे, राहूल गावडे, मधुकर मोहिते, किरण कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
