20 हजाराची लाच घेताना तलाठ्यासह एकाला अटक

साजणी : हातकणंगले तालुक्यातील साजणी तसेच तिळवणी या गावचे तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे( वय 41 ) यांच्यासह मदतनीस साहिल यासीन फरास( वय23 ) यांना आज 20 हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , खरेदी केलेल्या जमिनीची फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे यांनी 20 हजाराची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत विभागामार्फत पडताळणी करण्यात आली. त्यानुसार संबंधित तलाठ्याला आणि त्याला मदत करणाऱ्या मदतनीसला आज 20 हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलीस उप निरीक्षक संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. सुनिल घोसाळकर, पो.कॉ. रूपेश माने, पोकों उदय पाटील,पो.हे.कॉ. सुरज अपराध यांनी केली आहे.

🤙 8080365706