
टॅटू काढताना नेहमी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतो. तर जाणून घेऊयात शरीरावर टॅटू गोंदवण्याचे तोटे.

गोंदवून घेतल्याने व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याचा धोका असतो आणि अशा केसेस समोरही आल्या आहेत. टॅटू काढताना नवी सुई वापरली जाईल, याची खात्री करून घ्या.शरीरावर टॅटू काढल्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोकाही असू शकतो. अर्थात, ही गोष्ट आजपर्यंत सिद्ध झालेली नाही, परंतु टॅटूच्या शाईमध्ये असलेले काही हानिकारक घटक देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात.
शरीरावर टॅटू काढल्याने रक्तजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. सुई शेअर करणे, हेही त्यामागचे कारण असू शकते. यासाठी टॅटू काढताना स्वच्छता, नवीन सुई, रंग हे नवे व चांगल्या स्थितीतील आहेत ना याची काळजी घ्या. तसेच टॅटू बनवणाऱ्या व्यक्तीने हातमोजे घातले आहेत की नाही, या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे उत्तम असते. एकापेक्षा जास्त वेळा सुई वापरणे हे संसर्गाचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
