
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून तीन रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच लाखांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी या तिन्ही रुग्णांच्या नातेवाईकाना अर्थसहाय्य मंजुरीची पत्रे दिली.
विक्रमनगर येथील महेश देवाप्पा पोवार व नियाज अल्ताफ गुंडवडे आणि नंदगाव येथील केतन संभाजी लोहार हे तिघेजण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सचिवालयाकडून महेश देवाप्पा पोवार व केतन संभाजी लोहार यांच्या उपचारासाठी प्रत्येकी १ लाख तर नियाज अल्ताफ गुंडवडे यांना पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी या रुग्णाच्या नातेवाईकाकडे उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मंजुरीची पत्र सुपूर्द केली. आमदार पाटील यांनी यावेळी रुग्णांच्या प्रकृतीविषयी चौकशी करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.
