भटक्या कुत्र्यांना इच्छा मरण देण्याची मागणी

नवी दिल्ली : भटके कुत्र्यांचे माणसांवर होणारे जीव घेणे हल्ले आता नवीन नाहीत. रोज भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या कितीतरी घटना समोर येतात. अशातच आता भटक्या कुत्र्यांनाही इच्छा मरण देता यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.भटक्या कुत्र्यांच्या इच्छा मरणाच्या याचिकेवर आज सुनावणी होतेय. या निर्णय अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. हिंस्र आणि धोकादायक असणाऱ्या या भटक्या कुत्र्यांना मानवी पद्धतीने इच्छा मरण देण्यात यावं, अशी ही याचिका आहे. एखाद्या व्यक्तीने इच्छा मरणाची मागणी केल्यास त्याला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेत ज्या प्रकारे मृत्यू दिला जातो. त्या प्रकारे या भटक्या कुत्र्यांनाही इच्छा मरण देता यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

🤙 8080365706