गोकुळ च्या वतीने भुदरगडमध्ये प्रत्येक गावात वंधत्व निवारण कार्यक्रम: नंदकुमार ढेंगे

गारगोटी : गोठ्यातील वांझ जनावरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असून ही जनावरे दुधावर येण्यासाठी गोकुळने वंध्यत्व निवारणासाठी दोन महिन्याचा धडक कार्यक्रम सुरू केला असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळचे संचालक तथा भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार ढेंगे यांनी केले.

गोकुळ च्या वतीने महालवाडी ता. भुदरगड येथे तालुक्यातील वंध्यत्व निवारण कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालवाडी येथील विठ्ठलाई दूध संस्थेचे चेअरमन नवनाथ कोराणे हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सहाय्यक दूध संकलन अधिकारी अजित जगताप यांनी केले.गोकुळचे वरिष्ठ पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी.के .चव्हाण यांनी आपल्या भाषणात येत्या दोन महिन्यात भुदरगड तालुक्यातील प्रत्येक गावात वांझ जनावरे दुधावर आणण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रमाचे आयोजन करून जनावरांची तपासणी आणि औषध उपचार केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी नंदकुमार ढेंगे यांच्या हस्ते खोड्यावर श्रीफळ वाढवून तालुक्यातील वंध्यत्व निवारण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.महालवाडी येथील सर्व वांझ जनावरांची डॉ. पी.के. चव्हाण, कृत्रिम रेतन सेवक बाजीराव चौगले यांनी तपासणी करून औषधोपचार केले.

या कार्यक्रमास सरपंच दयानंद आरेकर, दिलीप निकाडे, विठ्ठल इंदुलकर, वनश्री कोराणे, भैरनाथ घावरे आदी मान्यवरांसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गोकुळचे विस्तार अधिकारी विक्रम पाटील (सोनाळीकर) यांनी मानले.

🤙 8080365706