
पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे. या धमकीनंतर भुजबळ यांनी पुण्यात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
ही प्रतिक्रिया देताना भुजबळांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव घेतलं आहे. मला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. पवार कुटुंब अशा गोष्टी करत नाहीत. शरद पवार तर मुळीच कधी अशा गोष्टी करत नाहीत. पवार धमकी देण्याची कामं करत नाहीत. तर ते वैचारिक लढाई लढतात, असं छगन भुजबळ म्हणालेत. अतिउत्साही लोक अशा धमक्या देण्याचं काम करतात, असंही ते म्हणाले.
