क्लस्टर स्कूलला विरोध असेल : आमदार जयंत आसगावकर

कोल्हापूर : आज 10 जुलै रोजी प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. सीईओ चव्हाण यांनी क्लस्टर स्कूलचा विषय घेतातचं आमदार असगावकर यांनी त्याला तीव्र विरोध केला.

वाड्यावस्ती वर बहुजनांची गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत. तुमच्या क्लस्टर स्कूल सुरू झाल्यास बहुजन समाजातील मुलं शिक्षण प्रवाहातून बाजूला सरली जातील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत क्लस्टर स्कूल सुरू होता कामा नये असे आमदार यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर मॅडम उपस्थित होत्या. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली.

प्राथमिक शिक्षणाधिकारी व सीईओ यांनी लवकरात लवकर मुख्याध्यापक प्रमोशन घेत असल्याचे सांगितले.तसेच ज्यांना या पूर्वी शाळा दिली आहेत त्यांनाही याच आठवड्यात प्रमोशन आदेश देत आहोत असे सांगितले. समाजशास्त्र विषय शिक्षकांना रिव्हर्स करण्याबाबत घेत असलेल्या जिल्हा परिषदच्या निर्णयाला शिक्षक समितीच्या वतीने कडाडून बैठकीत विरोध करण्यात आला. जे बारावी सायन्स आहेत पण सध्या समाजशास्त्र किंवा मराठी विषय शिक्षक आहेत जर त्यांनी बीएससी पूर्ण केली असेल तर आयुक्तांच्या कडून परवानगी घेऊन त्यांना विज्ञान विषय शिक्षक म्हणून नवीन आदेश देण्यात येईल.एखाद्या शाळेमध्ये यापूर्वी शिक्षक सरप्लस झाला असेल पण सध्या त्या शाळेत पट असेल तर त्या शिक्षकाला त्याच शाळेत ठेवले जाईल अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

23 जून 2023 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अजून दोन महिने करू नये अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली त्याला प्रशासनाने होकार दिला आपण महाराष्ट्र शासनाकडून तसे पत्र आणावे आम्ही सदर शिक्षकांना रिवर्स करत नाही असे सांगितले. प्रज्ञाशोध ची प्रमाणपत्र गेले दोन वर्ष दिली नसल्याचे अध्यक्ष प्रमोद तोंदकर यांनी निदर्शनास आणून दिले यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रज्ञाशोची प्रमाणपत्रे तात्काळ देण्यात येतील असे सांगितले. पगार खाती बदलण्यासाठी तीन महिने अगोदर अर्ज करावा अशी सूचना शिक्षणाधिकारी यांनी केली. इतर अनेक विषयांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, शिक्षक नेते कृष्णात कारंडे, शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी, जि प कर्मचारी चे संचालक बाजीराव पाटील, शिक्षक समितीचे नेते सतीश बर्गे, गणपतराव मांडवकर, सुनील कुंभार, बालाजी पांढरे, विनायक मगदूम, दीपक पाटील, युवराज सातोसे,आधी बहुसंख्य शिक्षक समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706