दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं, शरद पवार यांची साथ का सोडली?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये त्यांच्यासोबत मंत्री दिलीप वळसे पाटीलही आहेत. आता शरद पवारांची साथ का सोडली? याचे कारणही दिलीप वळसे पाटील जाहीर केले आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझ्या अनुभवाएवढे त्यांचे वय नाही, रोहित पवारांमुळे शरद पवार यांची साथ सोडली, असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.वळसे पाटील म्हणाले, रोहित पवारांचे वय 37 वर्षे आहे. मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचे वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवे.आपण हा निर्णय घेतला असला तरी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत, साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

🤙 8080365706