सर्वपक्षीय सन्माननीय नेते मंडळी व जनतेकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन……

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांचे सर्वपक्षीय नेते मंडळी, ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध शासकीय आस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

आज दिवसभरात आमदार डाॅ. विनय कोरे यांच्यासह आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर- सर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, कोल्हापूरच्या माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर, केडीसीसी बँकेचे माजी संचालक पी. जी. शिंदे, भाजपाचे नेते अरुणराव इंगवले, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी. एम. पाटील, दलितमित्र बळवंतराव माने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने राष्ट्रवादीचे गडहिंग्लज शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, कोल्हापूर स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, शाहुवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महादेव पाटील – साळशीकर, करवीर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर जांभळे, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक फिरोज सौदागर, गडहिंग्लज नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ. कावेरी चौगुले,

पुढारीचे सरव्यवस्थापक अनिल पाटील, केडीसीसी बँकेचे माजी संचालक अनिल पाटील, पार्श्वनाथ बँकेचे चेअरमन शंकर पाटील, कोल्हापूर महानगरपालिका नगरसेवक तौफिक मुल्लाणी, बाजार समितीचे माजी उपसभापती पैलवान मारुती ढेरे या प्रमुखांसह सर्वसामान्य जनतेनेही अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

तसेच, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. ए. बी. माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, महापालिकेच्या अधिकारी टीना गवळी, कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, मुख्यमंत्री सडक योजनेचे काटकर, यांनीही मंत्री मुश्रीफ यांचे अभिनंदन केले.

🤙 8080365706