महिला सेनेच्या पुनर्बांधणीसाठी मनसेची बैठक

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांना चांगली संधी देण्यासाठी , महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पुनर्बांधणी करिता प्रदेशाध्यक्ष रिटाताई गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज (रविवारी) रोजी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली .

सदर बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रिटाताई गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून येणाऱ्या १५ दिवसात ४ दिवसांचा तालुकानिहाय दौरा करून मुलाखती घेऊन नूतन नियुक्त्या करून जिल्हास्तरीय मेळावा घेण्याचे यशस्वी नियोजन करा अशा या बैठकीत सूचना देण्यात आल्या.

रिटाताई सोबत आलेल्या पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये सरचिटणीस सुचीता माने, ठाणे शहराध्यक्षा समीक्षा मरकांडे यांनी शहर, तालुका व जिल्हा पातळीवर काम करू इच्छिणाऱ्या काही नवीन महिलांशी यावेळी संवाद साधला. बैठकीनंतर महिला प्रदेशाध्यक्ष रिटाताई गुप्ता यांनी श्री अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले.

सदर बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, नागेश चौगुले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील , यतीन होरणे, प्रभात साबळे , रवी गोंदकर, भगवंत जांभळे,प्रताप पाटील, रोहन निर्मळ, सुधीर सुप्पल,अनिल निऊंगरे, अशोक पाटील, राजू चव्हाण , आनंदा घंटे, चंद्रकांत सांबरे, अभि कीर्तिकर, वैभव माळवे, निलेश आजगावकर, सुनील तुपे, राजन हुल्लोळी , सुशांत डोंबे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सदरहू बैठकीचे व दौऱ्याची नियोजन जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी केले.

🤙 8080365706