
बहिरेश्वर प्रतिनिधी / करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर व कोगे दरम्यानच्या बंधा-यावर पाणी आल्याने पर्यायी वाहतूक कसबा बीड व सांगरूळ मार्गे वळविण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या तूलनेत या वर्षी पावसाने ओढ दिल्याने जूलै महिन्यात पहिल्यांदाच पूल पाण्याखाली गेला आहे. शिवाय झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात बंधा-याला येवून तटली आहेत. कोगे ग्रामपंचायत प्रशासनाने बॅरेकेटस लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
