त्वचेच्या अँलर्जीसाठी घरगुती उपाय

बदलत्या ऋतुमानात त्वचेची एलर्जी होत असते आणि त्यावर नेमका उपाय काय करावा हे अनेकांना समजत नाही आणि म्हणूनच त्वचेच्या अँलर्जीसाठी घरगुती उपाय काय करता येतील या संदर्भात काही खास टिप्स.

अँपल सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि विषाणूंविरोधी गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे ते त्वचेवर लावल्याने अँलर्जीपासून आराम मिळतो आणि त्वचेवर संसर्ग वाढत नाही. तुम्ही पाणी गरम करा आणि त्यात अँपल म्हणजेच सफरचंदचे व्हिनेगर मिसळा. आता हे मिश्रण कापसाच्या मदतीने प्रभावित भागावर लावा. १५ ते २० मिनिटांनी त्वचा स्वच्छ धुवा.

कोरफडीच्या जेलमध्ये बरे करण्याचे गुणधर्म असतात. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म खाज सुटणे आणि लाल पुरळ उठण्यापासून रोखण्यास मदत करतात. प्रभावित भागावर ताजे कोरफड जेल लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा. कोरडे झाल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.

कडुलिंबात दाहकविरोधी आणि जिवाणूंविरोधी गुणधर्म असतात. त्वचेच्या अँलर्जीच्या उपचारांमध्ये हे प्रभावी मानले जाते. कडुलिंबाची पाने बारीक वाटून पेस्ट बनवा आणि त्वचेवर २० ते ३० मिनिटे राहू द्या. ती कोरडी झाल्यावर पाण्याने धुवा.

चहाच्या झाडाचे तेल त्वचेच्या अँलर्जीमध्ये खूप उपयुक्त आहे. यात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या अॅलर्जीपासून आराम मिळतो. त्वचेवर लालसरपणा आणि खाज सुटत असल्यास चहाच्या झाडाचे तेल हा एक चांगला पर्याय आहे.तुळशीत विषाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म मोठया प्रमाणावर असतात, जे तुमच्या त्वचेचे संसर्गापासून रक्षण करण्याचे काम करतात. याशिवाय, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या अँलर्जीशी संबंधित लालसरपणा, सूज आणि खाज सुटण्यापासून आराम देतात. यासोबतच तुळस ही अँलर्जीरोधक आहे. तुळशीची पाने धुवून त्याची पेस्ट बनवा. ती प्रभावित भागावर लावा आणि २० ते ३० मिनिटांनी धुवून टाका.

🤙 8080365706