आज आणखीन एक नेत्या शिंदे गटात जाणार?

पुणे : राज्यातील राजकारणात वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांना मोठे धक्के बसत आहेत. एक एक नेते त्यांना सोडून जात आहेत. आता आणखी एक धक्का ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटातून आणखी एक नेत्या शिंदे गटात दाखल होणार आहे. हा प्रवेश शुक्रवारीच होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेतील शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला होता. विधान परिषदेतील विप्लव बाजोरिया हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाची संख्या अजून कमी होणार आहे.

🤙 8080365706