कोथिंबीर जास्तकाळ टिकून राहण्यासाठी उपाय

कोथिंबीर निवडून – साठवून ठेवायला खूप कठीण जाते. कोथिंबीर बाहेर ठेवल्यास लवकर खराब होते. तसेच कोथिंबीरीचे पानं लवकर पिवळी सुद्धा पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोथिंबीर लवकर खराब होऊ नये म्हणून नेमके काय करावे हे सांगणार आहोत.

कोथिंबीर सुकू नये असे वाटत असेल तर, कोथिंबीर बर्फाच्या पाण्यात धुवा. असे केल्याने पाने कोमेजणार नाहीत, व ती अधिक काळ ताजी राहतील.

कोथिंबीर धुवून झाल्यानंतर सूर्यप्रकाशासमोर ठेऊ नका. यामुळे कोथिंबीर लवकर सुकण्याची शक्यता निर्माण होते. कारण कोथिंबीरीची पानं नाजूक असतात, त्या लवकर सुकतात. उन्हामुळे कोथिंबीर फ्रेश राहत नाही. म्हणून सावलीत कोथिंबीर वाळत ठेवा.

कोथिंबीर धुवून,निवडून झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. कोथिंबीर सुकण्याची भीती असल्यास त्यात ओला टिश्यू पेपर टाकून ठेवा. असे केल्याने त्याचा सुगंधही कायम तसाच राहेल. व सुकण्याची शक्यता देखील कमी होते.

जेव्हा कोथिंबीर घरी विकत घेऊन आणाल, तेव्हा सर्वप्रथम एका ग्लासामध्ये किंवा डब्यात पाणी भरून ठेवा. त्यात कोथिंबीरीची मुळं बुडवून ठेवा. असे केल्याने ते कोरडे होणार नाहीत आणि ताजे राहतील. हवं तसं आपण कोथिंबीरीची पानं काढून घेऊ शकता. मात्र, कोथिंबीरीवर पाणी शिंपडत राहा. जेणेकरून ती लवकर सुकणार नाही.

🤙 8080365706