
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मिथुन : गुरूकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
धनु : हितशत्रुंवर मात कराल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
