मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर उदय सामंत यांचा खुलासा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये एंट्री केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. पण ही फक्त अफवा आहे, कुणी तरी अफवा पसरवली आहे, असा खुलासा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली बैठक झाली. काही गोष्टी न घडता आपल्यापर्यंत कशा पोहोचतात. याचा संभ्रम असून त्याचे खुलासे करायचे आहेत. गेले 2 दिवस एकनाथ शिंदे कालच्या बैठकीत राजीनामा देणार असल्याची बातमी कुणीतरी पसरवली, आम्ही राजीनामे घेणारे आहोत. 12 महिन्यांपूर्वी राजीनामा कसा घेतला जातो हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं. शिंदे संयमी असल्यानं त्यांच्याबद्दल काहीही बोललेलं चालतं असे त्यांचे मनसुबे असतील. कालच्या बैठकीत सर्व आमदार खासदार नेत्यांनी क्लिअर सांगितलं आहे की शिंदेंवर आमचा विश्वास आहे, असं सामंत म्हणाले.

🤙 8080365706