
कोल्हापूर : शिक्षण सहसंचालक कार्यालयात तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागीय सहसंचालकासह दोघांना अटक केली आहे.


विभागीय सहसंचालक हेमंत नाना कठरे (वय 46), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव ( वय 32 ), कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोग( वय 34 ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षण संचालक कार्यालयावर छापा टाकून लाच घेताना या तिघांना अटक केली. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करिता आवश्यक त्या सोयी सुविधा आहेत, असं प्रमाणपत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाज मागून तडजोड केल्यावर 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना विभागीय सहसंचालक हेमंत नाना कठरेसह प्रवीण शिवाजी गुरव, कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोग या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल आहे.
यावेळी या कारवाईवर नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भंडारे,ए. एस. आय.प्रकाश भंडारे,पो.हे.काँ.विकास माने, पो.हे.काँ. सूनिल घोसाळकर ,पो.काँ रूपेश माने, संदीप पवार ,उदय पाटील यांनी केली.
