तुम्ही राजीनामा दिला होता तर मागे घेतलाच कशाला?; अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच थेट आणि जळजळीत टीका केली. आता 83 वर्ष झालं आहे. आता तुम्ही थांबा. आराम करा. आता तुम्ही थांबणार आहात की नाही? तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. तसेच तुम्ही राजीनामा दिला होता तर मागे घेतलाच कशाला? असा सवालही अजित पवार त्यांनी शरद पवार यांना केला.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा आज मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणाची पिसेच काढली. तसेच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडत नसल्याने त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाही चढवला. सर्वच क्षेत्रात निवृत्तीचं वय ठरलं आहे. सर्वच लोक निवृत्त होत असतात. पण तुम्ही अजूनही निवृत्त होण्याचं नाव घेत नाही. तुम्ही आता निवृत्त व्हा. आराम करा. आम्हाला मार्गदर्शन करा. काही चुकलं तर आमचे कान पकडा. आम्ही दुरुस्त करू ना? पण तुम्ही अध्यक्षपदी अजूनही आहात. का हे केलं जातं? कशासाठी केलं जातं? असा जळजळीत सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.

🤙 8080365706