
मुंबई ; ड्रामा क्विन राखी सावंत हिने बॉलीवूड भाईजान सलमान खानसाठी अनोखा नवस केला आहे. भाईजानंचं लग्न व्हावं म्हणून राखीनं अनोखी मन्नत मागितली असून त्यासाठी ती अनवाणी फिरत आहे.

राखीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राखी पिंक कलरच्या ब्लेझरने डोके झाकताना दिसत आहे.शिवाय ती अनवाणी चालताना दिसत आहे. राखी म्हणतेय की, मी नवस केलाय. सलमान खानने लग्न करावं मी श्रीलंका, दुबई येथून विना चप्पल आली आहे. जोपर्यंत सलमानचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. असे ती म्हणाली आहे.
