
मुंबई : चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा अपघात झाला असून लॉस एंजलिस येथे शूटिंगच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

अपघातामध्ये त्याच्या नाकाला इजा झाली असून त्याच्या नाकातून रक्त वाहत होतं त्यामुळे शस्त्रक्रिया देखील करण्याचा निर्णय घेण्यात आला . सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या चेहऱ्याला देखील गंभीर इजा झाली असून त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
