
मुंबई : राज्यात चाललेल्या राजकीय नाट्यावर मनसेचे नेते वसंतराव मोरे यांनी देखील ट्विट करत सर्वांना सनसनीत टोला लगावला आहे.

राज्यात 2019 ते 2023 या 4 वर्षांत झालेल्या राजकीय खेळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजितदादा पवार 3 वेळा उपमुख्यमंत्री, 1 वेळा विरोधीपक्षनेता, देवेंद्र फडणवीस 1 वेळ मुख्यमंत्री, 1 वेळ विरोधी पक्षनेता 1 वेळ उपुख्यमंत्री आणि आता थोड्याच दिवसात कदाचित पुन्हा मुख्यमंत्री, आता वर्षभर झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.आता परत जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेता. अरे म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राची सत्ता आपापसात वाटून घेताय का? सत्ताधारी तुम्हीच आणि विरोधी पक्षात पण तुम्हीच. हिम्मत असेल तर मनसेच्या या विधानसभेतील वाघाला किमान एकदा विरोधी पक्षनेता करा, मग तुम्हाला कळेल विरोधी पक्षनेत्याची दहशत काय असते, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
