
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाकडून एक प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्यात प्रत्येक पदाधिकाऱ्यांने आपल्या व्यक्तिक माहितीसह आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संविधानावर पूर्ण विश्वास, आणि निष्ठा असल्याचे सांगत. अजित पवार व त्यांच्या सहकारी आमदारांविरोधात निषेध व्यक्त करत असल्याचे लिहून जमा करायचे आहे.

या प्रतिज्ञापत्रात लिहले आहे की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संविधानावर पूर्ण विश्वास, निष्ठा आणि निष्ठा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आदर्शावर आणि तत्वांवर माझी बिनशर्त निष्ठा ठेवतो. मी असेही सांगतो की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाला माझा मनापासून, बिनशर्त, अटळ पाठिंबा आहे, असे त्या प्रतिज्ञापत्रात लिहले आहे.
