आजही भाजपला महाविकास आघाडीची भीती ; पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्या लोकसभा महत्त्वाची असल्याने सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. महाविकास आघाडीतून जे गेले ते गेले. मात्र, महाविकास आघाडीची भीती आजही भाजपला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

तसेच अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजे अजित पवारांचा शपथविधी असल्याचे ते म्हणाले.कऱ्हाड येथे रविवारी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला अनेक दिवसांपासून जी शंका होती, ती घटना अखेर आज घडलीच. याचा पहिला अंक आज झाला असून, पुढचे अंक येत्या दोन दिवसांत आपल्याला पाहायला मिळतील. राष्ट्रवादीतील आमदारांवर ईडीची छत्रछाया आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह शिंदे-भाजप गटात गेलेल्यांना चांगली झोप लागावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

🤙 8080365706