ए.वाय.पाटील अजित पवारांसोबतच

कोल्हापूर : काल राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार तीस आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. कालच त्यांनी 9 आमदारांसह मंत्री पदाची शपथ घेतली. या बदलत्या राजकीय घडामोडी नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील व त्याचे कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या सोबत राहणार की पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सोबत जाणार या बाबत अनेकाना उत्कंठा लागली आहे.

या राजकीय घडामोडींबाबत ए.वाय.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून अजित पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढे ही भक्कम राहणार असून जिल्हयात या पुढे पक्ष बांधनीचे काम जोमाने सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

🤙 8080365706