कागलमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष : हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

कोल्हापूर: आमदार हसन मुश्रीफ यांचा कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर कागल शहरातील चौका चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत आज गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ठीकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्ते जल्लोष करीत होते.

शहरातील गैबी चौक, खर्डेकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्यांचे वातावरण निर्माण झाले होते. तरुणांनी शहरातून मोटरसायकलची रॅली काढली. कार्यकर्ते गुलाल लावून एकमेकांना अलिंगन देत होते. ग्रामीण भागातील कार्यकर्ते देखील शहराकडे धाव घेत होते. गावागावांमध्ये देखील कार्यकर्ते जल्लोष करत असल्याचे दिसून येत होते.

🤙 8080365706