अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ…

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ हेही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. राजभवनात शपथविधी सोहळा सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनात पोहचले. चंद्रशेखर बावनकुळे हेही राजभवनात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांपैकी ९ जण मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची बैठक झाली. त्या बैठकीत भाजपला १४५ प्लस जागा हव्या असतील, तर अजित पवार हवेत, अशा अमित शहा यांनी सूचना दिल्या होत्या.

🤙 8080365706