
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर असणारा गट हा शिंदे-भाजप सरकारसोबत जाणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे.

राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची तर, छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ५४ आमदार आहेत. त्यापैकी ३० आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना आहे. या ३० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. हे पत्र घेऊन अजित पवार हे राजभवनावर पोहचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांच्या सह्यांचं पाठिंब्याचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. या पाठिंब्याच्या सह्यांचं पत्र अजित पवार हे राज्यपालांना सुपुर्त करतील. त्यानंतर आज सायंकाळी राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता आहे.
