अजित पवार पक्षनेते पदाचा देणार राजीनामा..

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असलेल्या चर्चांनीही जोर धरला आहे.

अजित पवार यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली होती. त्यासाठी १ जुलैपर्यंत त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. आज अचानक त्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षनेत्यांची बैठक बोलवली. या बैठकीला अनेक आमदारही उपस्थित होते. या बैठकीनंतर या सर्व नेत्यांचा ताफा राजभवनाकडे रवाना झाला आहे. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

🤙 8080365706