दरड कोसळल्यामुळे कास पठारावर पर्यटक अडकले

सातारा : सातारा शहरात पावसाचा जोर वाढत असताना शनिवारी रात्री यवतेश्वर घाटात अचानक दरड कोसळली. त्यामुळे येवतेश्वर घाटावरून कास पठाराकडे गेलेले पर्यटक या दरड कोसळल्यामुळे अडकले आहेत.

साताऱ्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या जाग्यावरच थांबून वाहतुकीची कोंडी झाली. पॉवर हाऊस परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दरड कोसळण्यामुळे एक दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

🤙 8080365706