
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी चंदगड मतदारसंघातीलफराळे- डवरवाडी- काळाम्मावाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विलास डवर यांच्या संकल्पनेतून दूधगंगा नगर केंद्र अंतर्गत विद्या मंदिर दूधगंगानगर, विद्यामंदिर काळम्मावाडी, विद्या मंदिर लिंगाचीवाडी, विद्यामंदिर फराळे, विद्यामंदिर डवरवाडी, विद्या मंदिर पाटपन्हाळा, विद्या मंदिर पाटपन्हाळा धनगरवाडा, विद्या मंदिर फराळे धनगरवाडा, विद्या मंदिर राजापूर, विद्यामंदिर धाऊरडवाडा (करंजवाडी) या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळा उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी विलास डवर,सुरेश पाटील, लक्ष्मण गिरी, विनोद डवर, उत्तम तळेकर, नामदेव वास्कर, विष्णूराम डवर अशोक डवर किरण डवर तसेच शेंडगे सर, वाय.जी.पाटील सर, बाबुराव नाटेकर सर, सागर पाटील सर विजय सुतार सर, तानाजी पाटील सर, रमेश पाटील सर रेवडेकर सर, मनोज पवार सर, मुकुंद डवर सर आणि केंद्रशाळे अंतर्गत सर्व शिक्षक हजर होते.
