
कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेपासून प्रेरित होऊन, १८ जून २०२० रोजी उप्पल शाह आणि हेमंत शहा यांनी साखर कारखाने व शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी BuySugar.com द्वारे साधार खरेदी आणि विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला.
या प्लॅटफॉर्मशी २८०० हून अधिक युजर्स / वापटकर्ते जोडले गेलेले आहेत. या प्लॅटफॉर्मवरून देशात साखर खरेदी-विक्री केली जाते. आतापर्यंत कोटी क्विटल पेक्षा जास्त साखरेची खरेदी-विक्री या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झाली आहे. ज्यातून तव्चल ३५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे आजपर्यंतचे सर्व खरेदी विक्री व्यवहार अगदी बिनचूक पार पडले आहेत. eBuysugar.com प्लॅटफॉर्म साखर खरेदीदारांना मोफत विमा सुविधाही देते. तसेच साखर खरेदीदारांच्या दुकानापर्यंत साखर सुस्थितीत पोहचविण्याची तसेच व्यवहार आणि पेमेंटची हमी देते. यामुळेच eBuySugar.com अगदी अल्पावधीत भारतातील सर्वांत मोठे पोर्टल बनले आहे.Buysugar.comचे संस्थापक आणि CEO उप्पल शाह म्हणाले की, देशात प्रथमच ऑनलाइन निविदा लॉन्च कार्यक्रम देशातील आघाडीच्या आणि सर्वांत मोठ्या ऑनलाइन प्लॅटफार्म Buysugar.com द्वारे आयोजित केला होता ज्यामध्ये व्यापाटी साखर कारखान्यातून थेट साखर खरेदी करतील आणि पेमेंटही पेट मिलच्या खात्यात जाईल. या ऑनलाइन टेडरचा शुभारंभ कार्यक्रम १ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.५५ वाजता लोकनेते सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा सहकारी साखर कारखान्या कार्यस्थळावर हा कार्यक्रम संपन्न झाला.

कारखान्याचे अध्यक्ष व खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी हमीदवाडा कारखान्याचे MD एन. वाय पाटील, मार्केटिंग मॅनेजर बागल, जे के ग्रुपचे चेअरमन जितूभाई शाह, उप्पल शाह, हेमंत साह. eBuysugar चे अधिकारी वर्ग, साखर कारखानदार, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते. हमीदवाड़ा कारखान्याचे पहिले aTender दुपारी ठीक १२ वाजता Buysugar.com वर घेण्यात आले व त्यास etiuysugar च्या युजर्स कडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार संजय मंडलिक म्हणाले, जसे जसे जग डिजिटलकडे वळत आहे व आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेनुसार आम्ही सुद्धा आता डिजिटल साखर विक्री करण्याचे ठरविले आहे. Buysugar यांनी ऑनलाइन टेंडर प्रक्रिया आणल्यामुळे आमची साखर देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून कोणतेही व्यापारी डायरेक्ट खरेदी करू शकतील आणि त्यामुळेच कारखान्याला चांगला दर मिळेल आणि त्याचा थेट फायदा ऊस उत्पादन सेवकांना होणार आहे. त्यांनी नमूद केले की, सगळे व्यवहार जर ऑनलाईन पद्धतीने पार पडत असतील तर हे कारखान्यासाठी हिताचे आहे. त्यामुळे साखर विक्री प्रक्रिये मध्ये पारदर्शिता बघायला मिळते आहे. आणि सर्वांनी ह्या Tender पद्धतीचा लाभ घ्यायला हवा.श्री. उप्पल शाह म्हणाले की, ई-वाय शुगर हे देशातील साखरेच्या व्यापारासाठी आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले आहे. याला ट्रेडिंग प्लेटफॉर्म म्हणूनही ओळखले जाते. eBuySugar.comही कोल्हापुरातील सुप्रसिद्ध JK समूहाची उपकंपनी आहे उप्पल साह आणि हेमत शहा यांनी अल्पावधीतच eBuy Sugar द्वारे देशातील साखर उद्योगात स्वतः चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. जितुभाई के. शाह यांनी १९८१ मध्ये स्थापन केलेल्या के ग्रुप समूहाने ई-वाय शुगर ऑनलाइन ट्रेड पोर्टल, चिनीमंडी न्यूज अँड मीडिया हाऊस, अॅग्रीमडी सल्लागार कंपनी, शुगट अँड इथेनॉल अवॉर्ड्स (SEIA अवॉड्स) आणि इंटरनॅशनल शुगर अँड इथेनॉल कॉन्फरन्स (SEIC कॉन्फरन्स) यांच्या माध्यमातून अतिरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे. eTender बद्दल माहिती देताना उप्पल शाह म्हणाले की, देशभरातील 2800 हून अधिक वापरकर्ते eBuysugar.com च्या माध्यमातून या ऑनलाइन टेंडटचा लाभ घेऊ शकतील. साखर उद्योगाशी संबंधित सर्वांनी या क्रांतिकारक घटनेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. देशातील प्रत्येक साखर व्यापाटी/ दलाल, मग तो मोठा असो वा छोटा, या ऑनलाइन निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन थेट मिलमधून साखर डिजिटल पद्धतीने खरेदी करू शकती. अशा प्रकारे, साखर विक्रीच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे साखर कारखानदारांना आणि आमच्या शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल. उप्पल वाह यांनी सर्व साखर कारखान्यांना eBuysugar.com प्लॅटफॉर्मवर त्यांची साखर विकून नफा वाढवण्याचे आवाहन केले.
