समृद्धी महामार्गावर बस जळून खाक : २६ प्रवासी मृत्युमुखी

बुलढाणा : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर एक खासगी बस डिव्हायडरला धडकून मोठा अपघात झाला. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 26 प्रवाशी होरपळून जागीच मृत्यूमुखी पडले.

तर आठ जणांना आपले प्राण वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, या आठही जणांना जबर मार लागला आहे. अपघातानंतर बस पेटल्याने बसचा जळून कोळसा झाला आहे. ही बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ आली. समृद्धी महामार्गावरून ही बस जात होती. त्यावेळी रात्रीचे एक ते दीड वाजला होता. त्यामुळे सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. ही बस पिंपळखुटा गावाजवळ येताच एका खांबाला धडकली. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ही बस पुढे असलेल्या डिव्हायडरला धडकली. त्यामुळे बसच्या टँकची डिव्हायडरला धडक लागली आणि टँक फुटला. त्यामुळे स्फोटाचा आवाज झाला अन् अचानक आग लागली.त्यानंतर तरीही बस डिव्हायडरला घासत पुढे गेली आणि पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांना बसमधून बाहेर पडणं कठिण झालं. तर एक चालक आणि इतर सात प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बसमधून बाहेर पडत स्वत:चे जीव वाचवले. रात्रीची वेळ असल्याने त्यांना इतर प्रवाशांचे जीव वाचवता आले नाही.आगीने बघात बघता रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे बसमधील 26 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या बसचा एक चालक दगावला आहे. तर दुसरा चालक शेख दानिश शेख इस्माईल हा बचावला आहे. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून बसचा केवळ सांगाडा उरला आहे. ही बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचं काम सुरू आहे.

🤙 8080365706