पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर कायमस्वरूपी सचिव नियुक्त करा : राहूल चिकोडे

कोल्हापूर : भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर कायमस्वरूपी सचिव नियुक्त करा अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे क्षेत्र मोठे असून यामध्ये अंबाबाई मंदिर, जोतीबा मंदिर त्याचबरोबर ०३ हजारपेक्षा जास्त मंदिरे देवस्थानच्या ताब्यात आहेत. कार्यक्षेत्राचा मोठा आवाका असणाऱ्या या देवस्थान समिती सचिव, अध्यक्ष यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. परंतु सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव पद रिक्त असून त्याजागी प्रभारी म्हणून सुशांत बनसोडे (प्रांत राधानगरी – कागल विभाग) हे कार्यरत आहेत. आपल्या विभागाचे काम पाहून देवस्थान समितीच्या कामासाठी पुरेसा न्याय देता येत नाही. त्याचबरोबर देवस्थान समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असल्यामुळे त्यांनाही पुरेसा वेळ नसल्याने अनेक प्रश्न, नित्याच्या अडचणी सोडवण्यात मर्यादा येत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर कायमस्वरूपी सचिव नियुक्त करा, अशी मागणी चिकोडे यांनी केली आहे.निवेदनामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी म्हंटले आहे की, शहरी भागापासून ते दुर्गम डोंगराळ परिसरात असलेल्या मंदिरांच्या, देवस्थान जमिनींच्या अनेक कामांसाठी नागरिकांना देवस्थान समिती सचिव किंवा जिल्हाधिकारी यांना वारंवार भेटावे लागते परिणामी असे महत्वाचे, निर्णयात्मक पद रिक्त असल्याने गौरसोय आणि जैसे थे परिस्थती निर्माण होऊन कोणतेही धोरणात्मक, विकासाभिमुख निर्णय घेण्यात मर्यादा येत आहेत.

🤙 8080365706