
कोल्हापूर : नागाळा पार्क, बावडा रोड येथील सेंट झेवियर्स स्कूलच्या कंपाउंड मधील झाड अचानक कोसळल्याची घटना आज घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.

प्रसंगावधान राखून एक कर्तव्यदक्ष नागरिक या नात्याने मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी तात्काळ महापालिकेला फोन करून कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला. सुमारे एक तासभर झाड कोसळल्याने पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विजय करजगार आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अशाप्रकारची वयोमर्यादा संपलेल्या झाडांचा सर्व्हे करून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावून होणारा धोका टाळावा ,असे आवाहन विजय करजगार यांनी प्रशासनाला केले आहे.
