कोल्हापूर – गारगोटी मार्गावर चार चाकीच्या धडकेत एक ठार

कोल्हापूर : कोल्हापूर – गारगोटी मार्गावर निगवे खालसा येथे आज सकाळी चारकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दगडू लक्ष्मण परीट ( रा.निगवे खालसा)असे मयत व्यक्तीचे नाव असून सागर लोखंडे( रा. दारवाड) असे चारचाकी चालकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार,करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथे राहणारे ६८ वर्षीय दगडू लक्ष्मण परीट हे आज सकाळी अकराच्या सुमारास आपले इस्त्रीचे दुकान बंद करून कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरून घराकडे परतत होते.दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो चारचाकी वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.या धडके त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झायाने अती रक्तस्त्रावाने जागीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.इस्पूर्ली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

🤙 8080365706