प्रसिद्ध अभिनेत्री आशा नाडकर्णी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आशा नाडकर्णी यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा नाडकर्णी यांचे मुंबईतील राहत्या घरी गुरुवारी रात्री निधन झाले. ते आपल्या कुटुंबीयांसोबत दक्षिण मुंबईमध्ये राहत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. अखेर वृद्धापकाळ आणि आजाराने त्यांचे निधन झाले. प्रख्यात दिग्दर्शक व्हि. शांताराम यांनी ‘ मौसी ‘ या चित्रपटात आशाजी यांना प्रथम अभिनेत्रीच्या रुपात काम दिले. त्यांना ही संधी वयाच्या 15 वर्षांच्या होत्या तेव्हा मिळाली होती.

🤙 8080365706