भगिरथ भालके यांचा BRS मध्ये प्रवेश: संजय राऊत यांचा निशाणा

मुंबई : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांनी BRS मध्ये प्रवेश केला. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची वकिली चंद्रशेखर बावनकुळे केव्हापासून करायला लागलेत. त्यांनी स्वत: च्या पक्षाकडे लक्ष द्यावं, असं संजय राऊत म्हणालेत.चंद्रशेखर बावनकुळे आणि हे भाजपची सी टीम आहेत. त्यांच्या हातात काही नाहीये. सगळं काही दिल्लीतून ठरवलं जातं. महाराष्ट्र भाजपची कमान ना देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात आहे. सगळं काही दिल्लीतील नेते ठरवतात. त्यानुसारच पुढे सगळं काही घडतं, असं संजय राऊत म्हणालेत.

🤙 8080365706