
कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोकराजा छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची 149 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांचेसह सर्व संचालकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.शाहू महाराज यांना आदरांजली वाहून अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रेरणेने व भास्करराव जाधव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेने उल्लेखनिय कामगिरी करीत ” 106 ” वर्षांचा टप्पा पार केला असल्याचे नमूद करुन इतर बँकेच्या तुलनेत बँकेने केलेली लक्षणीय प्रगती सातत्याने अशीच टिकवून ठेवण्याची ग्वाही दिली.
यावेळी उपाध्यक्ष अजित पाटील, संचालक सर्वश्री रविंद्र पंदारे, मधुकर पाटील (एम.एस), अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, प्रकाश पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह बँकेचे सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
