
पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सध्या पंढरपूरमध्ये आहेत. तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळ घेऊन के.सी. राव आज पंढरपुरात आहेत.

पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात जात केसीआर यांनी दर्शन घेतलं. तर रूक्मिणी मातेचंही त्यांनी दर्शन घेतलं आहे. यावेळी 10 दहा तेलंगणाचे मंत्री त्यांच्यासोबत होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. केसीआर यांच्यासोबत सहाशे गाड्यांचा ताफा होता. मात्र हा ताफा पंढरपूरबाहेरच अडवण्यात आला. केसीआर यांनी 10 मंत्र्यांसोबत विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी केसीआर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.केसीआर 600 गाड्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंढरपुरातही केसीआर आपल्या ताफ्यासह येत होते. मात्र पंढरपूरबाहेरच त्यांचा ताफा अडण्यात आला. आषाढी एकादशीमुळे अनेक भाविक पंढरपूरमध्ये आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव केसीआर यांना 600 गाड्यांचा ताफा न्यायला परवानगी नाकारण्यात आली.केसीआर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या व्हीआयपी गेटवर महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केसीआर यांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांकडून चोख पद्धतीने करण्यात येत आहे. बीडीडीएस पथकानंही मंदीर परिसराची तपासणी केली आहे.सुरक्षेत कोणतीही चूक होणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र पोलिसांकडून घेतली जात आहे.
