पत्नीच्या बॉयफ्रेंडचा गळा चिरून पती रक्तही प्यायला…..

चिक्काबालापूर: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नवऱ्याने तिच्या बॉयफ्रेंडचा गळा चिरला. त्यानंतर तो एवढ्यावरच नाही थांबला तर त्याने कापलेल्या गळ्याला थेट तोंड लावून तो त्याचे रक्त प्यायला.

हा सर्व प्रकार घडत असताना त्या नराधम नवऱ्याचा एक मित्र हे सगळे रेकॉर्ड करत होता. कर्नाटकातील चिक्काबालापूर येथे ही घटना घडली आहे.विजय असे त्या नराधम पतीचे नाव असून त्याला त्याच्या पत्नीचे मरेश याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या संशयातून त्याने मरेशची हत्या करण्याचे ठरवले. 19 जून रोजी विजय याने त्याचा मित्र जॉनच्या मदतीने मरेशला एका जंगलात नेले. तिथे त्याने आधी त्याचा गळा चिरला नंतर जसे गळ्यातनं रक्त येऊ लागले त्याने त्याच्या गळ्याला तोंड लावून ते रक्त प्यायले. त्याचा हा सर्व अघोरी निर्घृण प्रकार जॉनने मोबाईलमध्ये रेकॉ़र्ड केला. त्यानंतर दोघेही मारेशला तिथेच टाकून पळून गेले.सुदैवाने काही लोकांनी मारेशला जखमी अवस्थेत पाहिले व त्याला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने मरेशचे प्राण वाचले. रुग्णालयातून त्याने विजय विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी विजयला अटक केली आहे. तसेच जॉनलाही ताब्यात घेतले असून त्याच्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडीओ देखील सापडला आहे.

🤙 8080365706