औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे मोठा तणाव

बुलढाणा : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल बुलढाणा येथे सभा झाली. यावेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे मोठा तणाव पसरला असून येथील सालीपुरा भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

तर औवेसी यांनी यासंदर्भात माध्यमांशी चर्चा करण्यासाठी नकार दिला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सालीपुरा भागात ओवैसी यांची सभा पार पडली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी भर सभेत स्टेजजवळ येत “जब तक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा” अशा घोषणा दिल्या. यावेळी ओवैसी यांना “हा, हा, रहेंगा रहेंगा” असं म्हणत त्यांना शांत केलं.

🤙 8080365706