गडहिंग्लजमधील उद्योगपतीची पत्नी – मुलासह आत्महत्या

बालिंगा.गडहिंग्लज शहरातील सुप्रसिद्ध तेल उद्योजक संतोष शिंदे यांनी आज आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

संतोष शिंदे यांनी महाराष्ट्र ,कर्नाटक, गोवा मुंबई येथे अगदी लहान वयातच अर्जुन उद्योग समूहाचा विस्तार करून आपल्या अर्जुन ब्रँड चा नाव लौकीक करून बडे उद्योगपती मध्ये विश्वासाने स्थान निर्माण केले होते.

अर्जुन उद्योग समूह अंतर्गत खाद्य तेल, उत्पादन, बेकरी उत्पादन व्यायाम शाळा तसेच सामाजिक कार्य करत आपला उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला होता. अशा परिस्थितीमध्ये ते आज आत्महत्या करतील अशी कोणालाही शंका आली नाही. मात्र शुक्रवार रात्री त्यांनी आपले बायको मुलासह जीवन संपले. संतोष शिंदे हे तेल वापरामध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध प्रसिद्ध झाले होते. कोविडच्या काळात त्यांनी कामावर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासली होती. आज शनिवारी दि. २४रोजी सकाळी ते अजून आपल्या बेडरूम मधुन बाहेरू न आल्याने त्यांच्या आईने आसपासच्या लोकांना बोलवून घेऊन बेडरूमचा दरवाजातून तोडुन आत प्रवेश केला असता संतोष शिंदे,त्यांची पत्नी तेजेस्वीनी शिंदे व मुलगा अर्जुन शिंदे वय १३ असे तिघेजण त्यांना मृत्यू अवस्थेत आढळून आले. यावेळी त्यांनी विष पिल्याचे व गळ्यावर चाकु ओढुन घेतलेने जखम आढळून आली आहे. सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्या असून अद्याप पोलिसांनी ती जाहीर केलेली नाही. काही दिवसांपूर्वी संतोष शिंदे यांच्या वरती गडहिंग्लज येथील एका महिलेने कर्नाटक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपांमुळे त्यांना जवळपास एक महिना जेलवारी करावी लागली होती. त्यापासून ते सतत ताणतणावात होते. त्यातच व्यवस्थामध्ये येत असलेले अपयशा पाहून ये खचुन गेले होते. संतोष शिंदे यांचे वडील जिल्हा परिषद मध्ये वाॅचमन होते ,अशा गरीब परिस्थितीमध्ये मुलाचे व्यवसायातील यश पाहून भारावून गेले होते. नुकतेच त्यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.

अल्पवयात व्यवसायामध्ये गरूड झेप घेतलेल्या उद्योगपतीने अशा प्रकारे जिवन संपवून पुढील पिढीच नष्ट झालेने गडहिंग्लज मध्ये सर्वस्तरातून हळहळ व्यक्त करणेत येत आहे. संतोष शिंदे यांना ज्यांच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या आरोपीस अटक करावी म्हणून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी गडहिंग्लज शहर बंद ठेवण्यात यावे म्हणुन आवाहन केलेमुळे आज गडहिंग्लज बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान आरोपींना जो पर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृत्यू देह ताब्यात घेण्यास नातेवाईक यांनी नकार दिला आहे.

दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली असून ती गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सुसाईड नोटमधील तपशील समोर आल्यानंतर आत्महत्येचं खरं कारण समोर येणार आहे. 

🤙 8080365706