
मुंबई : अखेर मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने सुरुवात केली आहे.

यंदा राज्यात मान्सूनच आगमन उशिरानं झालं, त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला होता. मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. शुक्रवारी विदर्भात मान्सूनच आगमन झालं त्यानंतर आता आज मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसचे कोकण किनारपट्टीवर तीव्र गतीने वारे वाहनार असून, मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
