
मुंबई : मुंबई आणि पुणे ईडीच्या कारवाईने हादरलं आहे. या तीन दिवसात ईडीने जवळपास 16 ते 17 ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाची कोंडी केली जात असल्याने आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ईडीने गेल्या तीन दिवसात ठाकरे गटाशी संबंधित सुजीत पाटकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली.
